Breaking News

पनवेल अर्बन बँक निवडणुकीसाठी भरघोस मतदान; आज निकाल

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 27) मतदानप्रक्रिया झाली. यासाठी व्ही. के. हायस्कूल येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचा निकाल दुसर्‍या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 28) लागणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून पनवेल अर्बन बँकेवर शेकापची सत्ता राहिली आहे, मात्र दीर्घकाळ सत्ता असतानाही या बँकेचा शाखा विस्तार आणि विकास झालेला नाही. बँकिंगच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना सोयीसुविधाही मिळत नाही. त्यामुळे या वेळी शेकाप व मित्रपक्षांच्या महाआघाडीविरोधात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती अशी लढत आहे. महाआघाडीच्या सहकार पॅनलविरोधात भाजप युतीने उत्कर्ष पॅनल उभे करून आव्हान दिले. एकूण 13 जागांसाठी 27 उमेदवार पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मतदान केले, तर युतीच्या वतीने पोलिंग बूथवर भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः कमान सांभाळत मतदारांना उत्कर्ष पॅनेलला निवडून आणण्याचे आवाहन केले. त्यांच्यासमवेत भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक-नगरसेविका, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भूपेंद्र पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये गुरुवारी ’संदीप वैभव…आणि कविता’

कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिननिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ कवी विष्णू वामन …

Leave a Reply