Breaking News

दोन महिलांनी केली साडी दुकानातून एक लाख रुपये असलेली पर्स चोरी

पनवेल : वार्ताहर

साडीच्या दुकानात एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स दोन महिलांनी लंपास केल्याची घटना तालुक्यातील विचुंबे येथे घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विचुंबे गाव दिलीप निवास, आरती डेरीच्या बाजूला ओम साई कलेक्शन नावाने रोशनी प्रवीण रामाणे यांचे साडीचे दुकान आहे. या दुकानाच्या समोर मारुती वॅगन आर गाडी उभी राहिली त्यातून दोन महिला व त्यांच्यासोबत तीन लहान मुले दुकानामध्ये आले. साडी खरेदी करण्याच्या बहाण्याने ही लोक दुकानामध्ये आली व दुकानामध्ये असलेली पर्स घेऊन कारमध्ये बसून निघून गेली. या पर्समध्ये रामाणे यांचे रोख रक्कम एक लाख रुपये, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड  आदी वस्तू होत्या याबाबत रोशनी रामाणे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात कलम 380/34 नुसार गुन्हा दाखल केला आहे व अधिक तपास खांदेश्वर पोलीस करीत आहेत. दरम्यान, ठिकठिकाणी पोलीस चेकिंग असतानाही दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक भयभीत झाले आहेत.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply