Tuesday , February 7 2023

रायगडात सरपंचपदासाठी 901,सदस्यपदासाठी 4386 अर्ज दाखल

अलिबाग : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सरपंचपदाच्या 240 जागांसाठी 901, तर 1940 सदस्यपदांसाठी 4382 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी (दि. 3) संपली. शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यात येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली होती.
अलिबाग तालुक्यात सहा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 38, तर सदस्यपदाच्या 46 जागांसाठी 166 अर्ज दाखल झाले आहेत. मुरूड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 25, तर सदस्यपदाच्या 39 जागांसाठी 116 अर्ज दाखल झालेत. पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 110, तर सदस्यपदाच्या 226 जागांसाठी 580 अर्ज दाखल झालेत. पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 45, तर सदस्य पदाच्या 94 जागांसाठी 257 अर्ज दाखल झालेत. उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 105, तर सदस्यपदाच्या 164 जागांसाठी 553 अर्ज दाखल झालेत. कर्जतमध्ये सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 41, तर सदस्यपदाच्या 69 जागांसाठी 244 अर्ज दाखल झालेत.
खालापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 55, तर सदस्यपदाच्या 118 जागांसाठी 309 अर्ज दाखल झालेत. रोहा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 28, तर सदस्यपदांच्या 37 जागांसाठी 107 अर्ज दाखल झालेत. सुधागड तालुक्यात 14 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या ठिकाणी सरपंचपदासाठी 48, तर सदस्यपदाच्या 110 जागांसाठी 276 अर्ज दाखल झालेत. माणगाव तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींसाठी 70 जणांनी सरपंचपदाचे, तर सदस्यपदाच्या 167 जागांसाठी 311 उमेदवारी अर्ज दाखल झालेत.
तळा तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे तीन, तर नऊ सदस्यांच्या जागांसाठी 16 जणांनी अर्ज केला आहे. महाडमध्ये तब्बल 73 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तेथे सरपंचपदासाठी 216 जणांनी, तर सदस्यपदाच्या 549 जागांसाठी 956 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेत. पोलादपूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 53, तर 116 सदस्यपदाच्या जागांसाठी 180 अर्ज दाखल झालेत. म्हसळा तालुक्यात सरपंचपदाचे 31, तर 97 सदस्यपदाच्या जागांसाठी 149 अर्ज दाखल आहेत. श्रीवर्धन तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 33, तर सदस्यपदाच्या 99 जागांसाठी 162 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांची छाननी सोमवारी (दि. 5) होणार आहे.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply