Breaking News

पालीवाला महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

पाली : प्रतिनिधी

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या पाली येथील शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालाच्या आजपर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी (दि. 2) महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपप्राचार्य प्रा. एम. एस. लिमन यांनी या वेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाचा विकास आणि नॅकच्या द्ृष्टीने माजी विद्यार्थी संघटनेचे महत्व  प्रा. डॉ.  एम. ए. बडगुजर यांनी स्पष्ट केले. माजी विद्यार्थी रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस राजेश मपारा, पालीचे उपनगराध्यक्ष अरिफ मणियार, पत्रकार धम्मशील सावंत, रायगड पोलीस आजाद जाधव, जेएसडब्ल्यू कंपनीतीच्या अकाऊंटन्ट शैला भोईर, प्रा. संतोष भोईर, प्रा.अजित खरोसे यांनी आपले महाविद्यालयातील अनुभव सांगितले. या मेळाव्याचे नियोजन प्रा. एन. एन. पाटील, प्रा. विशाखा मानकामे, प्रा. एस. डी. देशमुख, प्रा. संतोष भोईर यांनी केले होते. महाविद्यालयाचे एनएसएस प्रमुख प्रा. एस. एस. बेलवलकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. राकेश शिर्के, प्रा. ज्ञानेश्वर मुंडे यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. प्रा. डॉ. एस. व्ही. पाथरकर, प्रा. डॉ. एस. ए. पाटील, ग्रंथपाल लिनताज उके, प्रा. अपर्णा केदारी, प्रा. दिपाली बांगारे, उत्तम शिंदे, चंद्रकांत गायकवाड, प्राध्यापकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. ए. एम सोहनी यांनी आभार मानले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply