पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी (दि. 27) नवे 156 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 27) तालुक्यातील 120, अलिबाग 11, उरण आठ, खालापूर सात, पेण चार, रोहा तीन, कर्जत दोन आणि पोलादपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पेण तालुक्यातील आहे.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,859 आणि मृतांची संख्या 1603 झाली आहे. आतापर्यंत 54,115 जण कोरोनामुक्त झाल्याने 1141 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper