Breaking News

नितळसमध्ये सरपंच, उपसरपंच चषक; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त

तालुक्यातील नितळस येथे स्व. पदू धर्मा मढवी यांच्या स्मरणार्थ सरपंच, उपसरपंच चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी (दि. 23) भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या वेळी धर्मा पावशे, शांताराम पाटील, भरत भोपी, आंबो सांगडे, अशोक पाटील, अल्पेश भोपी, शरद पावशे, वसंत म्हात्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. नितळस ग्रामपंचायतीच्या सरपंच अमृता कैलास मढवी आणि माजी सदस्य चित्रा सांगडे यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply