Breaking News

गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

अहमदाबाद : वृत्तसंस्था
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 8) जाहीर झाला. भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली असून 184 पैकी 156 जागा जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपचे सरकार आले आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या आम आदमी पक्षाला मात्र तीन ते दोन अंकी आकडा गाठणेही शक्य झाले नाही.
या निवडणुकीत भाजपने आपला 2002मधील 127 जागांचा तसेच काँग्रेसचा 1985मधील 149 जागांचा रेकॉर्ड मोडीत काढला. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला होता. या प्रचंड विजयानंतर भाजपकडून देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply