Breaking News

गावचे भविष्य घडविण्यासाठी विचार करून मतदान करा

आमदार महेश बालदी यांचे प्रतिपादन; भाताणमध्ये रॅली, सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त
ग्रामपंचायत निवडणूक ही आपल्या गावचे भविष्य घडविणारी निवडणूक आहे. त्यामुळे कर्नाळा बँक बुडवणार्‍यांच्या तसेच लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला न देणार्‍यांच्या मागे आपण राहणार आहोत की जगात देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या, विविध योजना, निर्णय, उपक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे आपण उभे राहणार आहोत याचा विचार करून मतदान करा, असे प्रतिपादन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी बुधवारी (दि. 14) भाताण येथे केले. ते जाहीर सभेत बोलत होते.
ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह आता शिगेला पोहचला आहे. भाताण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे युतीच्या प्रचारार्थ बुधवारी प्रचार रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचारानंतर आमदार महेश बालदी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत सभा झाली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी विरोधकांचा समाचार घेत या निवडणुकी विजय आपलाच होईल असा विश्वास व्यक्त केला.
बाळाराम पाटील यांच्या आमदारकीचे आठ महिने शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर त्यांचा दिवा पेटेल अस मला वाटत नाही किंबहुना हा दिवा पेटणार नाही याची तयारी आम्ही केली असून यामध्ये आम्ही नक्की यशस्वी होणार आहोत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर निधी कुठून देणार? ना त्यांचा आमदार, ना खासदार तसेच केंद्रात आणि राज्यातही यांची सत्ता नाही. जर यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. मग यांची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आल्यानंतर निधी कुठून उपलब्ध करून देणार, असा असा सवाल या वेळी आमदार महेश बालदी यांनी उपस्थित केला.
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भाताण ग्रामपंचायतीवर भाजप-मनसे युतीचा झेंडा फडकल्यास या गावचा विकास नक्की होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रचार रॅली व सभेस पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, पापा पटेल तसेच प्रवीण ठाकूर, मनसे तालुका अध्यक्ष रामदास पाटील, रवींद्र म्हात्रे, कैलास माळी, तानाजी पाटील, रवी म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
भाताण ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व मनसे युतीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार तानाजी लक्ष्मण पाटील असून प्रभाग क्रमांक 1मधून नितेश चंद्रकांत भोईर, प्रमिला कृष्णा जुमारे, रजनी किरण मुकादम, प्रभाग क्रमांक 2मधून रसिका स्वप्नील भोईर, विजय विष्णू ठाकूर, प्रभाग क्रमांक 3मधून मारुती नामदेव सते, योगिता दीपक दुर्गे निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply