Breaking News

कॅन्सरविरोधात जोरदार लढा

पनवेलमध्ये रिक्षाचालकांची कर्करोग तपासणी

पनवेल : वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 19) पनवेल परिसरातील रिक्षाचालकांची कर्करोग तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ 100पेक्षा अधिक रिक्षाचालकांनी घेतला असून, त्यात दोघांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. नवीन पनवेल सेक्टर 2 येथील शिवप्रेमी रिक्षाचालक-मालक संघटनेच्या सदस्यांसोबत कार्यक्रमाची सुरुवात रॅलीने करण्यात आली. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नवीन पनवेल येथील कर्नाटक संघाच्या सभागृहात इंडियन कॅन्सर सोसायटीच्या तज्ज्ञ डॉक्टर्सनी शंभरापेक्षा अधिक रिक्षाचालकांची सर्वसाधारण कर्करोगाची तपासणी केली. त्यास रिक्षाचालकांनी उत्स्फूर्त सहभाग दिला. त्यात दोघा रिक्षाचालकांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळली असून, त्यांच्यावर पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनच्या प्रेसिडेंट संजीवनी मालवणकर, प्रोजेक्ट डायरेक्टर विलास कावनपुरे आणि इतर सदस्यांनी योगदान दिले, तसेच शिवप्रेमी रिक्षाचालक- मालक संघटनेचे सहकार्य लाभले.

-उरणमध्ये ब्रेस्ट कॅन्सरवर व्याख्यान

उरण : रामप्रहर वृत्त

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात स्तनांचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर)  या विषयावर सोमवारी (दि. 18) व्याख्यान झाले. महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व लायन्स क्लब ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात वाशी एमजीएम हॉस्पीटलमधील कर्करोग तज्ञ डॉ. मंजुश्री नायर, डॉ. राहुल मांजरे यांनी स्तनांच्या कर्करोगासंबंधी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. डॉ. नायर यांनी स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे, कारणे, तसेच विशेषत: वयाच्या 20व्या वर्षानंतर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी मुलींनी आरोग्याविषयी कसे जागृत राहिले पाहिजे याविषयी सांगितले. या कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्ष संदीप जी. म्हात्रे, सेक्रेटरी प्रकाश नायर, सदस्य संध्याराणी ओव्होळ, शीतल तेलंगे, प्रकाश तेलंगे, डॉ. प्रीती गाडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या अध्यक्ष प्रा. ए. आर. कांबळे यांनी केले. स्वागत व परिचय प्रा. स्नेहा कोळी यांनी करून दिला; तर आभार प्रा. हन्नत यांनी मानले.

Check Also

भाजपच्या दणक्याने रूबी मिल्स कंपनी व्यवस्थापन नरमले

15 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र खोपोली, चौक : प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील …

Leave a Reply