Breaking News

पालीतील अरुंद रस्त्यांमुळे अपघातांना आमंत्रण

 

भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले ; दोन मुली थोडक्यात बचावल्या

पाली : प्रतिनिधी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील अरुंद रस्ते व वाहतुकीचे नियम तोडणारे वाहनचालक यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मंगळवारी सायंकाळी येथील सोनार आळीतील लब्धी ज्वेलर समोरील मुख्य रस्त्यावर एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले आहे. या वेळी तेथून जाणार्‍या दोन शाळकरी मुली थोडक्यात बचावल्या आहेत. ही दृश्य लब्धी ज्वेलर्सच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. या दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत व मुका मार लागला आहे. येथील स्थानिक दुकानदारांनी त्याला मदत केली. या अपघातामुळे तसेच अरुंद रस्ते, बेदरकार वाहने चालविणारे वाहनचालक, अवैध वाहतूक यामुळे पालीतील बाह्यवळण मार्गाची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पालीतील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, अवैधरीत्या पार्क केलेली वाहने व अनधिकृत बांधकामे यामुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होते. परिणामी वाहनचालक, भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची येथून वाट काढतांना मोठी गैरसोय होते. त्यामुळे जनतेतुन चीड़ आणि संताप व्यक्त होतोय.येथील बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेश्वर चौक, मारुती मंदिर अशा बहुतांश ठीकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. असंख्य कारणांमुळे पोलीसांना या वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशिर होतो. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्यवळण (बायपास) मार्ग लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडुन वारंवार
होत आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply