Breaking News

महासंचालकपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे रुजू

मुंबई : प्रतिनिधी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ. दिलीप पांढरपट्टे (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी (दि. 21) पदभार स्वीकारला. पांढरपट्टे यांची 1987मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली. 2000मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. 27 मार्च 2015 साली त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात येऊन त्यांचा समावेश 2004च्या बॅचमध्ये करण्यात आला. दरम्यान, दिलीप पांढरपट्टे यांचे विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई कार्यालयात स्वागत करण्यात आले. मंत्रालयात जात असताना त्यांनी या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी प्रभारी माहिती सहाय्यक वनिता कांबळे, लेखापाल गंगाराम बांगारा, वरिष्ठ लिपिक राजेंद्र मोहिते, लेखालिपिक राजश्री वाडेकर, लिपिक टंकलेखक प्रशांत गावंड, राम गोंदके, जितेंद्र यादव, संजय कोळी, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून …

Leave a Reply