Friday , September 22 2023

मुरूड पोस्ट ऑफिसमधील आधारकार्ड मशिन सुरू

मुरूड : प्रतिनिधी

येथील पोस्ट ऑफिसमधील आधारकार्ड बनवण्याच्या मशिनचा वापर केला जात नव्हता. ही मशिन धूळ खात पडल्यामुळे लोकांना आधारकार्डची सुविधा मिळत नव्हती. त्याबाबतचे वृत्त ‘दै. राम प्रहर‘मध्ये 25 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होताच टपाल विभागाला खडबडून जाग आली. त्यांनी मुरूड पोस्ट ऑफिसमधील बंद असलेली अधारकार्ड मशिन गुरुवार (दि. 10)पासून सुरू केली आहे.

नागरिकांना कमी दरात आधारकार्ड प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकाराने पोस्ट कार्यालयांस आधारकार्ड मशिन पुरविल्या होत्या, मात्र अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे मुरूड पोस्ट कार्यालयातील आधारकार्ड मशिन गेली अडीच वर्षे बंद अवस्थेत धूळ खात पडली होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्याबाबतचे वृत्त ‘दै. राम प्रहर‘ने 25 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. मुरूड येथील समाजसेवक ललित जैन यांनीही पोस्ट कार्यालयातील आधारकार्ड मशिन सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत मुरूड पोस्ट कार्यालयाने गुरुवारपासून आधारकार्ड मशिन सुरू केली आहे.आता पोस्ट ऑफिसमध्ये सुविधा झाल्याने कमी पैशांत लोकांना आधारकार्ड मिळणार आहे.

मुरूड पोस्ट कार्यालयातील आधारकार्ड मशिन गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. नवीन आधारकार्ड बनवायचे असेल तर ते विनाशुल्क राहणार आहे. आधारकार्डमध्ये दुरुस्ती अथवा फेरबदल करावयाचा असेल तर 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

-फैयाज पचूळकर, सब पोस्टमास्तर, मुरूड

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply