Breaking News

ठाकरे कुटुंबीयांच्या 19 बंगले गैरव्यहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांकडून रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील 19 बंगले गैरव्यहारप्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी (दि. 1) रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रेकॉर्डवरील कागदपत्रे गायब केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सोमय्या यांनी या वेळी केली.
रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर या परिवारांनी वास्तुविशारद कै. अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या कोर्लई गावातील 19 बंगले मिळकत व्यवहारात घोटाळा झाला असल्याचे प्रकरण किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा लावून धरले आहे. या संदर्भात रेवदंडा येथे पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोर्लई येथील 19 बंगले निवडणूक शपथपत्रात दाखविलेले नाहीत. हा गुन्हा आहे. यासंबंधी ग्रामपंचायतीने रिपोर्ट पाठविला आहे व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी 19 बंगले होते असे कबूल केले आहे. कोर्लई ग्रामपंचायतीने पंचानामा करून या बंगल्यांची घरपट्टी (कै.) अन्वय नाईक यांनी पहिली सहा वर्षे, तर नंतरची आठ वर्षे रश्मी ठाकरे यांनी भरली, मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी हे बंगले गायब केले. यामध्ये जि. प.चे सीईओ किरण पाटील व तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ग्रामसेवकावर दबाव आणून रेकॉर्ड गायब केले. म्हणून त्यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 415, 420, 467, 468, 471 आरडब्लू 34 या प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे. या विषयी ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी रिपोर्ट मागविला असून पुढील आठवड्यात हा रिपोर्ट त्यांच्याकडे पोहचेल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीही आश्वासन दिले आहे. पोलिसांना सात दिवसांत याचा तपास करून एफआरआय दाखल करावा लागेल, असेही सोमय्या यांनी पुढे म्हटले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासमवेत भाजपचे माजी दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष अ‍ॅड अंकित बंगेरा, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारंगे, संकेत जोशी, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply