Breaking News

सामान्य माणसाशी असलेली नाळ तोडू नका

आमदार भरत गोगावले यांचा डॉक्टरांना मौलिक सल्ला

महाड ः प्रतिनिधी

वैद्यकीय शिक्षण महाग होत असेल, तरी चांगल्या शिक्षणातून चांगले डॉक्टर घडत आहेत, मात्र डॉक्टरांनी सर्वसामान्य माणसाशी असलेली नाळ तोडता कामा नये असा सल्ला आमदार भारत गोगावले यांनी दिला. रायगड मेडिकल असोसिएशनच्या 23व्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात रायगड मेडिकल असोिएशनच्या 23व्या अधिवेशनास शनिवारी (दि. 7) सुरुवात झाली. या वेळी रायगड मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. आदेश पाथरे, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. हिम्मतराव बावस्कर, प्रसिद्ध बालरोतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, डॉ. आदित्य महामनकर, डॉ. राहुल सुकाळे, डॉ. सुनील नांदगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते. हे अधिवेशन दोन दिवस चालणार असून जिल्ह्यातील जवळपास 800 डॉक्टर सहभागी झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांवर तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी बोलताना आमदार भरत गोगावले यांनी, हे अधिवेशन महाडसाठी अभिमानास्पद बाब आहे असे सांगून रुग्णांना उपचार करून त्यांना मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचे काम आपण करीत असता. त्यामुळे आम्ही डॉक्टरांविषयी आमच्या मनात विशेष आदर असल्याचे सांगितले. अनेक रुग्णांना उपचार करण्यासाठी खिशात पैसा नसतो अशा रुग्णांना आम्ही मदत करीत असतो. त्यामुळे राजकारणात आम्ही यशस्वी होतो, मात्र सर्वसामान्य माणसाला वेळ दिला नाही, तर ते उद्या कोण तरी दुसरा राजकारणी धरतात. त्यामुळे आपणदेखील सर्वसामान्य माणसाला जाणून घ्या, अन्यथा दवाखान्याच्या इमारती कितीही मोठ्या असल्या तरी रुग्ण अन्य पर्याय स्वीकारतात. त्यामुळे आपण सामान्य रुग्णाशी असलेली नाळ तोडता कामा नये, असा सल्ला दिला. या दोन दिवसांच्या अधिवेशनात डॉक्टरांना नवनवीन औषधे, तंत्रज्ञान याची माहिती नव्याने मिळणार असल्याचे रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आदेश पाथरे यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply