Breaking News

रेल्वे ब्लास्टमधील पीडितांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत

कर्जत, मोहोपाडा : प्रतिनिधी
23 डिसेंबरला खालापूर तालुक्यातील चौक जवळील वावरले – वडविहीर येथे रेल्वेच्या कामासाठी करण्यात येणार्‍या ब्लास्टिंगचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांचा मोठा उद्रेक झाला होता. त्यामध्ये मृत झालेल्या माय-लेकाच्या कुटुंबियांना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 50 लाख रुपयांचा मदत निधी मिळाला आहे. वावरले-वडविहीर येथे रेल्वेच्या कामासाठी करण्यात येणार्‍या ब्लास्टिंगचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. नुकसानभरपाई देण्यास नकार देणार्‍या ठेकेदारासह संबंधित दोषींवर पोलिसांनी कारवाई केली होती. या दुर्घटनेत कर्जत तालुक्यातील किरवली येथील देवाकाबाई बडेकर (आई) सचिन बडेकर (मुलगा) या दोघांना नाहक जीवाला मुकावे लागले असताना या कुटुंबाचा आधारच हरवल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
कोसळला आहे. नागपूर अधिवेशन संपवून आमदार महेंद्र थोरवे यांनी तातडीने या कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबाला मदतीचा शब्द दिला होता. त्यानंतर रेल्वेच्या ठेकेदार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बडेकर कुटुंबाला 50 लाख मदतीचा धनादेश दिला.

मी कायमचा या कुटुंबाच्या सोबत असून जे जे करता येईल ते ते आमदार म्हणून नाही तर एक भाऊ म्हणून या कुटुंबाला कायमच सहकार्य करणार आहे.
-महेंद्र थोरवे, आमदार

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply