Breaking News

पनवेल महापालिकेमार्फत क्षमता बांधणी प्रशिक्षण

पनवेल ः प्रतिनिधी

शासन सातत्याने कर्मचार्‍यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने विविध सुविधा देत असते. या सुविधांचा कर्मचार्‍यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. कोविड काळात ज्या पद्धतीने मास्क, हॅण्डग्लोज सफाई कामगारांनी वापरले होते, तसेच कायमस्वरूपी कचरा संग्रहण करत असताना,कचर्‍याची हाताळणी करताना कामगारांनी वापरून, स्वतः ची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सफाई कर्मचार्‍यांच्या  क्षमता बांधणी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त वैभव विधाते यांनी केले. पनवेल महापालिकेद्वारे स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सफाई कर्मचार्‍यांसाठी दोन दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे. या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत कचर्‍याचे वर्गीकरण, आपत्ती काळात काम करताना घ्यावयाची काळजी ,सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज याबद्दल माहिती माहिती देण्यात आली. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम फाउंडेशनच्या साहाय्याने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या वेळी विभाग प्रमुख अनिल कोकरे, डॉ. मनीषा चांडक, काम फाऊंडेशनचे संतोष पाखरे आणि प्रसन्न येवलकर, प्रभाग ‘क’चे  सर्व आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. काम फाउंडेशनचे प्रसन्न येलवकर यांनी कचर्‍याचे विविध प्रकार सांगून त्यांचे वर्गीकरण, त्याचे फायदे-तोटे सांगितले. डॉ. मनीषा चांडक यांनी सफाई कामगारांना सफाई कार्य करताना होणारे रोग, कामगारांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याबद्दल माहिती दिली. संतोष पाखरे यांनी मॅनहोल टू मशीन होल सांडपाणी आणि मलमूत्र यांचे ड्रेनेज लाईनमध्ये एकत्रीकरण होऊन निर्मित होणारे गॅसमुळे निर्माण होणारा धोका व सफाई उपकरणाचा वापर करून हा धोका कसा कमी करता येतो, यावेळी वापरात येणारी उपकरणे याबद्दल कामगारांना माहिती देण्यात आली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply