Breaking News

पनवेल पोलिसांच्या वतीने समाजप्रबोधन कार्यक्रम

पनवेल ः वार्ताहर

पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून 2 जानेवारी ते 08 जानेवारी रोजी दरम्यान पोलीस रेजिंग डे सप्ताह पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने साजरा करण्यात आला. पनवेल तालुका पोलिसांमार्फत परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त पकंज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात विविध समाजप्रबोधन उपक्रम  राबवण्यात आले. यामध्ये नशा मुक्ती व सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्याला भेट, हत्यारांसह पोलीस कामकाजाची माहिती यांचा समावेश होता. कोन गाव येथील सेंट झेवियर्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस ठाण्याचे कामकाज, उपलब्ध हत्यारांची माहिती घेतली. हा कार्यक्रम पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदिश शेलकर, गोपनीय विभागाचे अंमलदार राजेंद्र कुवर, सचिन होळकर व इतर अधिकारी तसेच कर्मचारीवर्गाचा सहभाग होता. उपस्थितीत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शेडुंग फाटा येथील सेंट विल्फ्रेड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना समाजसेवक बशीर कुरेशी यांच्या आशा की किरण फाउंडेशनद्वारे नशामुक्ती, सायबर गुन्हे, मानवी तस्करीबद्दल पथनाट्य व जागरूकता अभियान राबवण्यात आले.

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply