पनवेल : प्रतिनिधी
बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
मुंबईच्या सत्र न्यायालयात सोमवारी (दि. 21) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड सुनील गोन्साल्वीस, ईडीचे असिस्टंट डायरेक्टर सुनील कुमार आणि प्रेमसिंग मिना उपस्थित होते. विवेक पाटील यांच्यातर्फे अॅड. राहुल ठाकूर हजर होते. या वेळी अॅड. गोन्साल्वीस यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 24 मार्चला करण्याचा निर्णय घेतला.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper