Breaking News

कर्जत नगरपरिषदेच्या बायोगॅस प्रकल्पाची पाहणी

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला केंद्र सरकारने सन्मानित केले आहे. मात्र मागील काही दिवस हा प्रकल्प तेथून हटविण्यात यावा, अशा मागणीसाठी स्थानिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी मोर्चेकर्‍यांनी सामोरे जाताना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्याधिकार्‍यांनी पळसदरी रस्त्याच्या बाजूला असलेल्या प्रकल्पाला तसेच शहरातील गुलमोहर विश्रामगृहासमोर असलेल्या बायोगॅस प्रकल्प यास भेट दिली आणि जनतेच्या प्रश्नावर अधिकारी वर्गाला सूचना दिल्या. कर्जत शहराला भूषण ठरलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प त्या भागातून हलविण्यात यावा या मागणीसाठी कर्जत शहरातील भिसेगाव, गुंडगे या रहिवाशी भागातील नागरिक तसेच पळसदरी ग्रामपंचायती मधील नांगुर्ले गावातील ग्रामस्थांनी कर्जत नागरपरिषदेवर घनकचरा प्रकल्प हटाव या बॅनर साठी मोर्चा काढला. त्यावेळी कर्जत शहरातील नागरिकांच्यादृष्टीने जिव्हाळ्याचा बनलेला होता. त्यावेळी मुख्याधिकारी गारवे यांनी मागण्या लक्षात घेवून आठ दिवसांच्या आत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथील तुटलेली भिंत, वाहणारे सांडपाणी आणि सुटणारी दुर्गंधी यावर कार्यवाही केली जाईल. तसेच त्या ठिकाणी बंद असलेल्या मशिनरी तसेच बायोगॅस प्रकल्प हे 15 दिवसांच्या आत कार्यान्वित केले जातील, असे आश्वासन दिले. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी अधिकारी वर्गासह घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्प येथे भेट देखील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. त्यावेळी पालिकेचे आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, स्थानिक नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख लक्ष्मण माने, विद्यूत विभागाचे प्रमुख सुनील लाड हे सोबत होते. बायोगॅस प्रकल्पामध्ये 2021मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी उल्हास नदीचे पाणी घुसले होते आणि त्यावेळी तेथील डोममध्ये बिघाड झाल्याने गॅस निर्मित बंद आहे. तर येणार्‍या दोन टन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया सुरु असल्याने हा पूर्ण प्रकल्प 100 टक्के सुरु राहण्यासाठी हा प्रकल्प उभारून देणारी संबंधित यंत्रणेला बोलावून दुरुस्तीचे नवीन अंदाजपत्रक बनविण्याचे निर्देश यावेळी दिले.

स्थानिक नागरिकांना पूर्वी सारखे दुर्गंधी नसलेला कचरा डेपो पहायचा असून त्यासाठी पालिकेकडून कामाच्या जबाबदारी वाटून देण्यात आल्या आहेत. निर्धारित वेळेत सर्व प्रकल्प मधील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचवेळी दुषित दुर्गंधी पसरु नये यासाठी तात्काळ कार्यवाही केली जात आहे.

: वैभव गारवे, मुख्याधिकारी

प्रकल्पाला कोणताही धोका नाही!

तसेच अनेक वर्षात महापुराचा धोका निर्माण झाला तरी बायो प्रकल्पला कोणताही धोका निर्माण होणार नाही. अशी रचना दुरुस्तीच्या कामात करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे भेट दिली असता कर्जत शहरातून येणार्‍या कचरा घंटागाडीमधून खरेच वर्गीकरण करून येतो काय? याची पाहणी मुख्याधिकारी यांनी यावेळी केली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply