Breaking News

कर्जत येथील विनय वेखंडे यांची शेती अभ्यास दौर्यासाठी निवड

कर्जत : प्रतिनिधी

इस्रायल देशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेतकर्‍यांचे एक पथक पाठविण्यात येणार आहे. शेतकरी दौर्‍यासाठी कर्जत तालुक्यातील वदप गावातील प्रगत शेतकरी विनय मारुती वेखंडे यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य कृषी विभागाच्या पुणे येथील कृषी आयुक्तालयातर्फे  देशाबाहेरील प्रगत आणि उत्पादकता वाढ करण्यात महत्वाचे ठरत असलेल्या देशांचा दौरा आयोजित केला जातो. या दौर्‍यासाठी  दरवर्षी राज्यातील 50 प्रगत शेतकर्‍यांची निवड केली जाते. जगात इस्त्रायल हा शेतीबाबत प्रगत देश समाजाला जातो. तेथील शेतकरी कशा प्रकारे शेती उत्पादनात वाढ करतात, स्वतःचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि शेती पिकांची उत्पादता वाढविण्यासाठी कशा उपाययोजना करतात तसेच शेती मालाचा दर्जा वाढविण्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजना, कृषी पिकांवरील प्रक्रिया, कृषी उत्पादनाचे ग्रेडिंग, प्रतवारी कशी वाढवावी, पिकांची तसेच मालाची साठवणूक क्षमता कशी वाढवावी यासाठी शेतकर्‍यांकरीता इस्रालय दौरा महत्वाचा समजला जातो.

या अभ्यास दौर्‍यासाठी निवड झालेले विनय वेखंडे हे दुबार पीक घेणारे शेतकरी असून, भाताचे विक्रमी उत्पादन घेण्याचा मान त्यांच्याकडे आहे. भाताच्या पिकांबरोबर फळशेती, फुलशेती, भाजीपाला शेती आणि कडधान्य शेती, कुकुटपालन आदी सर्वच शेती प्रकारात वेखंडे यांचे काम सुरु असते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply