Breaking News

संत रोहिदास महाराज जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री संत शिरोमणी रोहिदास ज्ञाती विकास मंडळ, ग्रामस्थ मंडळ सावळे आणि जय दुर्गामाता सांस्कृतिक व सेवाभावी मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा जयंती उत्सव सावळे येथे मोठ्या उत्साहात झाला. ह.भ.प. गुरुवर्य किसन महाराज साखरे, ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर, तसेच ह.भ.प. तुकाराम महाराज केदारी यांच्या आशीर्वादाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात काकड आरती, भजन, श्री संत ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्यायाचे पारायण, भजन, हळदीकुंकू समारंभ, आळंदी येथील ह.भ.प. अनिल महाराज रोही शात्री यांचे कीर्तन, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम झाले. या उत्सवास रायगड, नवी मुंबई, मुंबई परिसरातील अनेक मान्यवरांनी भेट देत दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घेतला. उत्सवाच्या सुयोग्य नियोजनासाठी ज्येष्ठ, तसेच महिला व तरुणांनी मेहनत घेतली.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply