Breaking News

पनवेलमध्ये मेडन ट्रॉफी चॅम्पियनशीप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मेडन ट्रॉफी चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. तक्का येथे खेळल्या जाणार्‍या 12 वर्षांखालील मुलांच्या या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच झाले. उद्घाटन समारंभास नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका सुशीला घरत, अकॅडमीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहिते, उपाध्यक्ष अंकल बहिरा, रायगड जिल्हा लेदर क्रिकेट 14 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक जाँटी, निवड समिती अध्यक्ष प्रीतम कैय्या व पनवेल क्रिकेट अकॅडमीचे सर्व सभासद व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 25 षटकांच्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी दोन सामने खेळवण्यात आले. पहिल्या सामन्यात रायगड क्रिकेट अकॅडमी खोपोली या संघाने फ्युचर स्टार क्रिकेट क्लिनिक या संघावर मात केली. फ्युचर संघाने रायगड संघाला 25 षटकांत 127 धावांचे लक्ष दिले होते जे रायगड संघाने तीन गडी राखून पूर्ण केले. फ्युचर संघातर्फे आदर्श राजभार याने 28 धावा केल्या, तर रायगड संघातर्फे आर्यन निकाळजे याने 28 धावा केल्या. रायगड संघाचा अथर्व पाटील सामनावीर ठरला. त्याने तीन विकेट घेतल्या व फलंदाजीत 14 धावा केल्या. दुसरा सामना पनवेल क्रिकेट अकॅडमी ज्युनियर संघ व करण क्रिकेट अकॅडमी यांच्यात झाला. यामध्ये करणे अकॅडमीने पनवेल अकॅडमीला चार विकेट राखून पराभूत केले. करण अकॅडमीच्या फैज दळवी याने स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकताना 51 धावा केल्या व सामनावीर किताब मिळविला. पनवेल अकॅडमीच्या विघ्नेश पाटील याने 31 धावा करून एकाकी लढत दिली. स्पर्धा 10 दिवस चालणार असून यात आठ संघ सहभागी होत आहेत. जिंकणार्‍या संघास पनवेल क्रिकेट अकॅडमी मेडन चषक बहाल करण्यात येणार आहे. या वेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी अकॅडमीचे कोच प्रतिक मोहिते यांचे लेदर क्रिकेटला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आभार मानले तसेच जिल्हा संघात विविध वयोगटांतील पनवेल क्रिकेट अकॅडमीच्या सहा खेळाडूंची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply