Breaking News

पनवेल परिसरात अपघातांमध्ये दोन जण ठार; एक जखमी

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार व एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर व खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दादर वरून पुणे येथे पार्सल घेऊन टेम्पोचालक रविकांत तिवारी जात असताना त्याने पनवेलजवळील पळस्पे येथे संतोष उदावंत या व्यक्तीला खोपोली येथे सोडण्यासाठी टेम्पोत घेतले. ही गाडी पुढे गेली असता त्याच मार्गावरील अमोल पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरवर टेम्पो जाऊन धडकला. यात संतोष उदावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दुसर्‍या घटनेत मोटरसायकलस्वार आतिष भोईर हा त्याचा मित्र नागेश याला सोडण्यासाठी सुकापूर येथून भोकरपाडा येथे जात होता. या वेळी आकुर्ली गावाजवळ समोरून येणार्‍या पिकअप टेम्पोला त्यांच्या मोटरसायकलीची धडक बसली. यात आतिष भोईर याचा मृत्यू झाला आहे तर त्याचा मित्र नागेश हा जखमी झाला आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply