Tuesday , March 28 2023
Breaking News

महिला टीम इंडियाने इतिहास रचला!

पहिला अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकप जिंकला

सेनवेस पार्क ः वृत्तसंस्था

भारताच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करीत क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या 19 वर्षाखालील महिला विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेत रविवारी (दि. 29) झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंड संघाला 68 धावांमध्ये गुंडाळून नंतर सात विकेट्सने मात देत विश्वचषक उंचावला. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो गोलंदाजांनी सार्थ ठरवित 17.1 षटकांत संपूर्ण इंग्लंड संघाला 68 धावांमध्ये तंबूत धाडले. तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करीत चार षटकांत केवळ सहा धावा देत दोन विकेट्स घेतल्या. अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन, तर मन्नत कश्यप, शेपाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडकडून रॅना हिने सर्वाधिक 19 धावा केल्या. माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी स्फोटक खेळी सुरु केली, पण एक चौकार आणि एक षटकार ठोकून कॅप्टन शेफाली 15 धावांवर तंबूत परतली. श्वेताही पाच धावा करून बाद झाली. नंतर सौम्या तिवारी आणि गोगंदी त्रिशा यांनी एक चांगली भागिदारी करीत भारताचा विजय पक्का केला. त्रिशा 24 धावा करुन बाद झाली, पण तोवर भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला होता. सौम्यानेही नाबाद 24 धावा केल्या. भारताने 14 षटकात 69 धावा करत सामना आणि विश्वचषक जिंकला.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply