Breaking News

कोकणात होळीसाठी एसटीच्या 250 विशेष गाड्या

मुंबई : प्रतिनिधी
गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी 7 मार्चला आहे. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपाल्या गावी जात असतात. या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून यंदा कोकणात होळीसाठी 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
3 मार्च ते 12 मार्चदरम्यान जादा एसटी गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
एसटीच्या या जादा बसेस मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरीवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल बसस्थानकातून  खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागात सोडण्यात येणार आहेत. आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्याhttps://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच Msrtc Mobile Reservation App याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply