Breaking News

विचुंबे येथे संयुक्त जयंती सोहळा साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त  : दुर्गामाता मित्र मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विचुंबे, ता. पनवेल येथील विठ्ठल-रुक्मिणी मैदानात बुधवारी (दि. 15) छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला विचुंबे गाव भाजपचे अध्यक्ष के. सी. पाटील, सल्लागार नितीन भोईर, उपाध्यक्ष अनिल भोईर, गणेश भिंगारकर, युवामोर्चा अध्यक्ष विवेक भोईर, राम म्हात्रे, नयन भोईर, दुर्गामाता मित्र मंडळाचे अध्यक्ष डी. के. भोईर, संयुक्त जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष अविनाश सुभाष गायकवाड, उपाध्यक्ष जगदिश विष्णू भोईर, प्रमुख सल्लागार अनंता (आप्पा) गायकवाड, सरचिटणीस सुनील पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर सुरते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोईर, प्रमोद भिंगारकर, अक्षता गायकवाड, नविता भोईर, प्राजक्ता भोईर, सुनीता भिंगारकर, माजी सरपंच अमिता म्हात्रे, संगीता भोईर, सामाजिक कार्यकर्त्या निलम भिंगारकर, भाग्यश्री भोईर, भगत मॅडम, भाजप कार्यकर्ते अ‍ॅड. परेश केशव गायकवाड, चेतन सुरते, अर्जुन सुरते, नितीन सुरते, संजय भिंगारकर, प्रेम भिंगारकर, प्रशांत गायकवाड, दिलीप कांबळे, राजेश कांबळे, दिनेश गायकवाड, अनिकेत गायकवाड, कल्पेश भोईर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply