Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोखाडा महाविद्यालयात विविध उपक्रमांचे उद्घाटन

मोखाडा : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाला संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भरीव देणगी दिलेली आहे. त्यातून होत असलेल्या विविध उपक्रमांचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 17) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बायो क्लॉक टेक्निक, महाविद्यालयासाठी पार्किंग शेड, ग्रंथालयाचे नूतनीकरण, विज्ञान विभागासाठी चार लायब्ररीज तसेच जिम्नॅशियम हॉल यांचे उद्घाटन करण्यात आले. मोखाडा येथील महाविद्यालयासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यापूर्वी दोन कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे, तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासह त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी शुक्रवारी आणखी 51 लाख रुपये देणगी जाहीर केली. याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
आदिवासींच्या विकासासाठी जे काय करता येईल ते तुम्ही करा. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन. कामे गुणवत्तेची व उत्तम दर्जाची झाली पाहिजे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. बोर उपस्थित होते. त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply