निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. 17) याबाबतचा निर्णय दिला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविण्याची ठाकरे गटाची मागणी शुक्रवारी फेटाळली. हे प्रकरण आता पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार आहे. ठाकरे गटासाठी हा धक्का असताना सायंकाळी मोठा हादरा बसला.
महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी भूकंप झाला होता. शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह उठाव केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री बनलेले शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. तो मान्य झाला आहे.