Breaking News

पत्रकार दिनानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम; आदिवासींना अन्नधान्य वाटप

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी (दि. 6) पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील दुर्गम भागातील फणसवाडी (खैरवाडी) येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटपाचा मदत कार्यक्रम करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या या ठिकाणी असणार्‍या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पनवेलमधील पत्रकारांकडून एक अनोखा संदेश देण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने पत्रकार दिनी समाजाची सेवा करून एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. या वेळी समितीचे जेष्ठ सल्लागार माधव पाटील, प्रमोद वालेकर, अध्यक्ष रत्नाकर पाटील, उपाध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संजय कदम, सचिव रवींद्र गायकवाड, सहसचिव सुधीर पाटील, खजिनदार हरेश साठे, सदस्य विवेक पाटील, विशाल सावंत, प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर सचदेव, रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

पनवेल : 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी मराठी वृत्तपत्र दर्पण बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास संस्था व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मायेची ऊब उपक्रमांतर्गत दुंदरे येथील आदिवासी पाड्यावर ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल तालुका पत्रकार मंचचे अध्यक्ष माधव पाटील, संजय कदम, विवेक पाटील, हरेश साठे, नितीन कोळी, प्रवीण मोहोकर, केवल महाडिक, रवींद्र गायकवाड, प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अ‍ॅड. मनोहर सचदेव, विशाल सावंत, ओमकार महाडिक, नारायण चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पर्यावरण असंतुलनामुळे द्रोणागिरी डोंगराला धोका

संरक्षणासाठी ठोस पावले उचला; आमदार महेश बालदी यांची ‌‘लक्षवेधी‌’ पनवेल : रामप्रहर वृत्तउरणमधील ऐतिहासिक आणि …

Leave a Reply