आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती
कर्जत : प्रतिनिधी
नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाचीवाडी ते फणसवाडी या रस्त्याचे काँक्रिटकरण करण्यात आले आहे. कर्जत राज्यमार्ग रस्ता ते मोहाची वाडी आणि तेथून पुढे फणसवाडी या रस्त्याची अनेक वर्षे दुरवस्था झाली होती. 2009 मध्ये या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर दहा वर्षात शासनाने या रस्त्याच्या कामाकडे पाहिले नव्हते. आता या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्याने या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
या रस्त्यासाठी मोहाचीवाडी रहिवाशी संघ अनेक वर्षे पाठपुरावा करीत होते. रहिवाशी संघाचे चव्हाण तसेच दिवंगत आप्पा देशमुख यांनी अनेक वर्षे शासन दरबारी आवाज उठवला होता. मागील वर्षी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदारांचे हस्ते झाले होते.
या रस्त्याच्या कामाला निधी प्राप्त झाल्यानंतर मोहाचीवाडी ते फणसवाडी या कामाचे काँक्रिटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीस खुला झाला. याप्रसंगी संतोष भोईर, भाई गायकर, राजेंद्र तेंडुलकर, उषा पारधी, धर्मानंद गायकवाड, गीतांजली देशमुख, उमा खडे, जयश्री मानकामे, अंकुश दाभणे, अंकुश शेळके, गजेंद्र वाघेश्वर, प्रभाकर देशमुख, किसन शिंदे, मिना पवार, गायकवाड, भगवान चव्हाण आदी उपस्थित होते.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …