Breaking News

मोठा खांद्यात शेकापला खिंडार; ज्येष्ठ, महिला व युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष, भाजप जिल्हा अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन पनवेलजवळील मोठा खांदा गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ, महिला व युवा अशा शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे या विभागात शेकापला आणखी एक मोठा झटका बसला आहे. या वेळी पापडीचापाडा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही ‘कमळ’ हाती घेतले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, विकास घरत, नितीन पाटील, नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगरसेवक गणपत म्हात्रे, महेंद्र कावळे, माजी नगरसेविका अलका भगत, भाऊ भगत, शशिकांत भगत, सतीश पाटील, परेश पाटील, अमोल भगत, अरविंद भगत आदी उपस्थित होते.

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाला केंद्रबिंदू मानून काम केल्याने या मतदारसंघात विकासाचा झंझावात निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध पक्षांतील सक्रिय कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे वाढला आहे. याच अनुषंगाने मोठा खांदा गावात परिवर्तन झाले.

– यांनी केला पक्षप्रवेश

शेकापचे हरेश संभाजी भगत, जयहिंद जगन्नाथ भगत, हनुमान कमलाकर दुंद्रेकर, श्रीधर बाबूराव कावळे, केतन राम भगत, तुषार मनोज  दुंद्रेकर, नितेश निवृत्ती भगत, सागर ज्ञानेश्वर भगत, राहुल जनार्दन गोंधळी, श्रीकांत राम भगत, श्रावण कमलाकर गोंधळी, दिलीप रामभाऊ गोंधळी, रोशन मदन भगत, रवींद्र सदाशिव गोंधळी, मनोज कमलाकर दुंद्रेकर, गणेश रघुनाथ भगत, प्रभाकर नारायण भगत, चंद्रकांत कमलाकर भगत, गुरुनाथ हरिश्चंद्र कावळे, हर्षद नझीर शेख, रोहिदास चंदर गोंधळी, संभाजी बाळाराम भगत, नामदेव गजानन भगत, अनंता गोमा कावळे, शंकर लहू गोवारी, कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, सुनील नारायण भगत, विजय वसंत भगत, विनोद धर्मा भोईर, प्रतीक जयहिंद भगत, रितेश अनिल भगत, अतिश अनिल भगत, विशाल चंद्रकांत भगत, जयेश अंबाजी भगत, अमृत हिरा भगत, राजू हिरा भगत, सचिन शशिकांत भगत, सुनील बामा भगत, विष्णू वसंत भगत, ऋषभ विजय भगत, सौरभ विजय भगत, रोहिदास लहू गोवारी, परशुराम गजानन पाटील, गजानन आल्या पाटील, चंद्रकांत बामा भगत, अंबाजी बामा भगत, नामदेव सीताराम पाटील, नाना नामदेव पाटील, सावळाराम रघुराम भगत, योगेश संभाजी भगत, विकास कांताराम पाटील, मोहन चांगा सुरते, कृष्णा चांगा सुरते, सुनील बामा भगत, निलेश अंबाजी भगत, सचिन नामदेव भगत, प्रवीण नामदेव भगत, प्रज्ञेश परशुराम पाटील, नितेश निवृत्ती भगत, उमेश हनुमान दुंद्रेकर, समीर हनुमान दुंद्रेकर, नितीन हनुमान दुंद्रेकर, नरेश धर्मा भोईर, उमेश निवृत्ती भगत, अनिकेत देवराम नाईक, प्रवीण मनोज दुंद्रेकर, महिला अध्यक्षा अरुणा सुनील भगत, उपाध्यक्ष गीता विजय भगत, शारदा श्रीधर कावळे, प्रतिभा सावळाराम भगत, सुगंधा भरत कावळे, बुगणाबाई कमलाकर गोंधळी, प्रमिला जयहिंद भगत, बामीबाई लहू गोवारी, मंदाबाई संभाजी भगत. सुनीता प्रभाकर भगत, वत्सला मदन भगत, यशोदा प्रकाश गोंधळी, शारदा कृष्णा पाटील, लता मनोज दुंद्रेकर, पदीबाई महादेव म्हात्रे, शांताबाई अंबाजी भगत, मंदाबाई चंद्रकांत भगत, राधाबाई केशव भोईर, राजश्री विनोद भोईर, गीता ज्ञानेश्वर भगत, कविता हरेश भगत, योगिता योगेश भगत, वैजयंती श्रीकांत भगत, जनाबाई पांडुरंग गोंधळी,  कमळीबाई राम भगत, उषा अनिल भोईर, सीता राम भगत, योगिता विष्णू भगत, सलमा मजीद शेख, मयुरी पिनू भगत, रेवती महेश भोईर, लक्ष्मीबाई महादेव म्हात्रे, गुणाबाई संभाजी नाईक, आशा परशुराम पाटील, शिवानी प्रतीक भगत, संगीता रवींद्र गोंधळी, ललिता निवृत्तीनाथ भगत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या वेळी राष्ट्रवादीचे पापडीचापाडा येथील केशव घरत, जाफर खान, अमोल गोसावी, दिनेश अहिरे, विक्रम गोळसे, सादिक तडवी यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply