Breaking News

मंगळवारपासून बारावीची परीक्षा; शिक्षण मंडळ सज्ज

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. 21)पासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी झाली असून तीन हजार 195 मुख्य केंद्रांवर 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये सात लाख, 92 हजार, 780 विद्यार्थी, तर सहा लाख, 64 हजार, 441 विद्यार्थिनी आहेत. परीक्षेच्या तयारीबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक या वेळी उपस्थित होत्या.
कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आकलनासाठी 10 मिनिटे देण्याऐवजी परीक्षेच्या शेवटी 10 मिनिटे दिली जातील. परीक्षा केंद्र परिसरातील 100 मीटर परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply