Breaking News

आमदार महेश बालदी यांचा पुढाकाराने आदिवासी बांधवांना मथुरा अयोध्या काशीचे दर्शन

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रयाण

पनवेल : रामप्रहर वृत्त
आपल्या मतदार संघातील आदिवासी वनवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी उरण मतदार संघातील 1250 आदिवासी बांधवांना 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत मथुरा-अयोध्या-काशी या तीर्थस्थळांची यात्रा आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने या यात्रेला पनवेल रेल्वे स्थानकात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांचे कौतुक करत त्यांना तसेच यात्रेकरूंना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, मुकीद काझी, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, कामोठे संपर्क प्रमुख विनोद साबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, भाताचे सरपंच तानाजी पाटील, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, रेल्वे पोलीस निरीक्षक सीताराम राणा, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, मंगेश वाकडीकर, धीरज ओवळेकर, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय मुरकुटे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या यात्रेकरूंची व्यवस्था बघण्यासाठी 100 स्वयंसेवक यात्रेकरूंबरोबर आहेत. ही यात्रा पूर्णतः मोफत असून यात्रेच्या कालखंडात चहा, नाष्टा, जेवण, तसेच राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे आदिवासी समाजात आनंदाची भावना व्यक्त झाली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply