18 जणांना आश्वासित प्रगती लाभ
नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध संवर्गातील आठ कर्मचार्यांना पदोन्नती तसेच 18 कर्मचार्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्मचार्यांची पदोन्नती व आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे विषय मागील दीड वर्षापासून विशेष लक्ष देत मार्गी लावण्यात येत असून त्यामुळे महापालिका कर्मचा-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जुलै 2021पासून 55 संवर्गातील 601 कर्मचार्यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. 41 संवर्गातील 315 अधिकारी, कर्मचारी यांची पदोन्नती करण्यात आलेली आहे. यामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना लाभ मिळवून देण्यावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे.
मागील दीड वर्षात 35 संवर्गातील 307 महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आलेली असून यामध्ये अधिकची भर घालत 20 फेब्रुवारीला आणखी सहा संवर्गातील आठ कर्मचार्यांना वरील संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामध्ये एक स्वच्छता निरीक्षकास स्वच्छता अधिकारी पदावर, एका लिपिक टंकलेखकास वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक पदावर, एका वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षकास अधिक्षक/वसुली अधिकारी पदावर, एका अधिक्षकास प्रशासकिय अधिकारी पदावर, तीन स्टाफनर्स कर्मचार्यांस सिस्टर इन्चार्च या पदावर तसेच एका वरिष्ठ लिपिक (लेखा) पदावरील कर्मचार्यास उपलेखापाल/ लेखा परीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे या पदोन्नती मिळालेल्या आठ कर्मचार्यांपैकी स्वच्छता अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सिस्टर इन्चार्ज/नाईट सुपरवायझर या तीन पदांवरील तीन कर्मचारी हे दिव्यांग आहेत. अशाप्रकारे सर्व घटकातील कर्मचा-यांवर लक्ष देण्याच्या आयुक्तांच्या निर्देशांचे प्रशासन विभागामार्फत पालन केले जात आहे.
Check Also
भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक
पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …