Breaking News

रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टकडून मोफत रुग्णवाहिका

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्व. मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठ्यातील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका रूजू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच भजनी मंडळाला वाद्य साहित्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्थेची भेट माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आली. तरुणांना प्रेरणा देण्याचे सामाजिक कार्य रविशेठ जोशी यांच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
कामोठे सेक्टर 35 येथील श्री गणेश मंदिरात बुधवारी (दि. 22) हा समाजोपयोगी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येेष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, दिलीप पाटील, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव, भाजप नेते श्रीनंद पटवर्धन, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपचे कामोठे अध्यक्ष तथा आयोजक रविशेठ जोशी, के. के. म्हात्रे, पनवेल ग्रामीण संपर्क प्रमुख राजेश गायकर, भाऊ भगत, रवी गोवारी, भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जयेंद्र जोशी, सुशील शर्मा, तेजस जाधव, सचिन पाटील, रोशन भोपी, रोहन भोपी, रमेश तुपे, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे, दामोदर चव्हाण, प्रदीप भगत, डॉ. सुभाष जाधव, स्वप्नाली म्हात्रे, डॉ. विनय जैसवाल, काकासाहेब कुत्तरवडे, आर. जी. म्हात्रे, महेंद्र भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, स्वतःच्या दुःखातून सावरून कामोठेवासीयांसाठी आपण काय करू शकतो या भावनेने रविशेठ जोशी काम करीत आहेत. त्यांचे हे कार्य तरुणांसाठी प्रेरणा देणारे असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कला त्यांच्यात आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी, रविशेठ जोशी हे ट्रस्टच्या माध्यमातून परिसरातील रहिवाशांना आपण काय सेवा देऊ शकतो यासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करीत आहेत. दुःखातून सावरत समाजासाठी मी अधिक काम करेन या भावनेतून त्यांनी ही रुग्णवाहिका सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे इतरांचे दुःख हे आपले दुःख मानून जोशी हे सामाजिक कार्य करतात याचा मला अभिमान वाटतो, असे उद्गार काढले.
रविशेठ जोशी यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून कामोठेवासीयांना मोफत रुग्णवाहिका सेवा आणि विविध साहित्याचे वाटप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेने केले आहे, असे सांगितले.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply