Breaking News

विराट कोहली बनला अलिबागकर!

अलिबाग : प्रतिनिधी
निसर्गरम्य अलिबागची सर्वांनाच भुरळ पडलेली आहे. उद्योजक, राजकारणी, अभिनेते तसेच क्रिकेटर तेथील निसर्गाला मोहून अलिबागकर झाले आहेत. त्यामध्ये आता भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याची भर पडली आहे. अलिबागच्या आवासमध्ये विराटने सहा कोटींचा बंगला खरेदी केला आहे. त्याचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गुरुवारी (दि. 23) अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात पूर्ण केला.
अलिबागमध्ये आवास येथील आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपीचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प बनविण्यात आला आहे. अनेक कलाकार, क्रिकेटर या प्रकल्पात बंगलो खरेदी करीत आहेत. नुकतेच अभिनेता राम कपूर व गौतमी कपूर यांनीही या प्रकल्पात दोन घरे खरेदी केली आहेत. विराट कोहलीसुद्धा या प्रकल्पाचा भाग झाला आहे. त्याने तब्बल सहा कोटी रुपयांना एक घर खरेदी केले आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये चालू असलेल्या कसोटी मालिकेमुळे विराट स्वतः अलिबाग येथे उपस्थित राहू शकला नाही. त्याचा भाऊ विकास कोहली हा खरेदी व्यवहार विराटच्या वतीने पूर्ण केला. याकामी अ‍ॅड. महेश म्हात्रे यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply