Breaking News

गुढीपाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलेन -राज ठाकरे

पनवेल : प्रतिनिधी
मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेलमध्ये आयोजित केलेल्या राजभाषा महोत्सवात सोमवारी (दि. 27) पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत काही विधाने केली तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलणार असल्याचे म्हटले.
पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’ठाकरे नेमके काय वाचतात’ या विषयावर राज ठाकरे यांची विशेष मुलाखत अमोल परचुरे यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये राज यांनी राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडणे टाळले. मला कुठलाही टीझर, ट्रेलर सांगायचा नाही. मी 22 मार्च रोजी गुढीपाडव्याला सिनेमा दाखवणार आहे, असे ते म्हणाले.
प्रत्येक मराठी माणसाने आपण कोण आहात हे समजून घेण्यासाठी तरी मराठी वाचले पाहिजे, असे सांगून राज यांनी आपले वाचन दहावीनंतर सुरू झाले. व्यंगचित्रामुळे वर्तमानपत्राचे, पुस्तकांचे वाचन वाढले, कारण त्यामुळे कल्पना वाढतात, पण मी आवश्यक तेवढेच वाचतो. ‘सामना’ आणि ‘मार्मिक’ घरी येतो, पण वाचत नाही, असे सांगितले.
28 सप्टेंबरला लता मंगेशकर यांची जयंती असून मी लतादीदींवर एक पुस्तक करतोय, अशी माहितीही राज ठाकरे यांनी या वेळी दिली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply