आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी मी आणला याचे मला समाधान आहे. सर्वांगीण विकासाचे धोरण समोर ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगाने काम केले. वनवासी आणि आदिवासी बंधू-भगिनींनी मुख्य प्रवाहात आणणे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून आपण भारतीय जनता पक्षात आहोत, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी शनिवारी (दि. 5) विकासकामांच्या भूमिपूजनावेळी केले.
माजी आमदार मनोहर भोईर हे सत्तेत आमदार होते. अडीच वर्ष त्यांचे मुख्यमंत्री होते, मात्र त्यांनी एकतरी विकासाचे ठोस काम केले असल्याचे दाखवावे, असे आव्हान आमदार महेश बालदी यांनी मनोहर भोईरांना दिले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या सुमारे सात कोटी 11 लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी झाला. यामध्ये एक कोटी रुपयांच्या निधीमधून माणघर शाळा आणि जिमसाठी बहुउद्देशीय इमारत बांधणे, 50 लाख रुपयांमधून भंगारपाडा नानोशी रस्ता काँक्रीटीकरण करणे, 20 लाख रुपयांतून माणघर येथील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, 10 लाख रुपयांतून मोसारे आदिवासीवाडी येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, 10 लाख रुपयांतून मोसारे येथे गणपत शेळके ते जयवंत तांडेल यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून नानोशी ग्रामपंचायत अंतर्गत आवळीचा मळा येथे रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून पाटणोली येथे प्रदीप पाटील यांच्या घरापासून मुख्य रस्त्याकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून पाटणोली येथे अंकुश पाटील यांच्या घरापासून मुख्य रस्त्याकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून पाटणोली येथे पाटणेवरी मंदिर ते मठाकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून बावळीची वाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, 10 लाख रुपयांतून बेलवाडी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून ग्रामपंचायत नानोशी अंतर्गत कामतवाडी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून ग्रामपंचायत नानोशी अंतर्गत बुधाजी पारधी ते श्रावण भल्ला यांच्या नवीन घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून नानोशी ग्रामपंचायत अंतर्गत श्रावण भल्ला यांच्या घरापासून गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे, 10 लाख रुपयांतून गराडे येथे अनंता दरवडा ते मंगेश शिंगवा यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून मंगेश शिंगवा ते कैलास पारधी यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयांतून नानोशी फाटा ते पांडुरंग भुतांब्रा यांच्या घराकडे जाणारा रस्ता, 10 लाख रुपयांतून पांडुरंग भुतांब्रा ते नानोशी ब्रिजकडे जाणारा रस्ता तयार करणे, आठ लाख रुपयांतून नानोशी ब्रीज ते आत्माराम म्हात्रे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बांधणे, 10 लाख रुपयांतून नानोशी अंगणवाडी ते सुरेश कांबळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, भंगारपाडा येथे सुमारे 21 लाख रुपयांच्या निधीमधून जेएनपीटी हायवे ते जिल्हा परिषद शाळेपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, कुडावे येथे दोन कोटी 50 लाख रुपयांमधून पुलाचे काम, 35 लाख रुपयांतून ठोंबरेवाडी पुलाचे काम, 15 लाख रुपयांतून झपाटेश्वर मंदिर सभागृह बांधणे, 11 लाख रुपयांच्या निधीतून वडवळी येथे अंगणवाडी बांधणे, 10 लाखांच्या निधीतून स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे, 20 लाख रुपयांच्या निधीमधून सांगुर्ली चिरवत येथील गटार आणि रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि 11 लाख रुपयांच्या निधीमधून सांगुर्ली ग्रामपंचायत अंतर्गत तुरमाळे येथील गटार आणि रस्ते बांधण्यात येणार आहे.
या कामांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कुडावे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे सुदाम पोशा ठाकूर, पांडुरंग शांताराम ठोंबरे, तुळशीराम धर्मा ठोंबरे यांनी; तर भाजपचे केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून ग्रामपंचायत सदस्य विजय भोपी, अक्षय पवार, माजी उपसरपंच प्रमोद कर्णेकर, राम वाजेकर, जगदीश ढवळे, युवा कार्यकर्ते अभिजित मुकादम, मदन खारके, अनिल टकले, रोशन घरत, जगदीश चौधरी, अनंत भोपी, दत्ता मुकादम, कृष्णा वाजेकर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमांना भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, सरपंच विजेता भोईर, मंगेश वाकडीकर, कल्पेश पाटील, आदित्य गायकर, विनायक पाटील, अशोक कोंडीलकर, सखाराम ठाकूर, दापोलीचे माजी सरपंच सुभाषशेठ म्हात्रे, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, उपसरपंच गजानन पाटील, उपाध्यक्ष राकेश गायकवाड, मनकुशभाई नाईक, ओवळेचे सरपंच रूपेश गायकवाड, प्रगट कडू, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, प्रकाश पाटील, तालुका उपाध्यक्ष के.ए. म्हात्रे, मेघा दमडे, माजी पं. स. सदस्य सदस्य श्रावण भल्ला, रेखा म्हात्रे, सुनिता कटेकर, जिल्हा सरचिटणीस रूपेश धुमाळ, महेंद्र पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, मनोहर शेळके, रवींद्र पाटील, दीपक पाटील, नामदेव पाटील, निकेश म्हात्रे, विष्णू आंब्रे, वडघर अध्यक्ष सुभाष पाटील, माजी सरपंच प्रभाकर पाटील, महादेव पाटील, अनंत शिर्के, गणेश म्हात्रे, माजी उपसरपंच वैभव पाटील, नारायण चौधरी, नामदेव उदरे, मधुकर उदरे यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply