Breaking News

सदस्य नोंदणी : युवा मोर्चाची ‘सीकेटी’त आढावा बैठक

खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त

भाजपच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानाचा पनवेलमधील आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 26) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी, महाराष्ट्र प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. या अभियाना संदर्भातील भाजप युवा मोर्चाची पहिली आढावा बैठक खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात संपन्न झाली. या बैठकीवेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, श्रीनंद पटर्वधन, उपमहापौर विक्रांत पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, दिनेश खानावकर, विनोद घरत, चिन्मय समेळ, हर्षवर्धन पाटील, अमर ठाकूर, मयुरेश नेटकर, अभिषेक भोपी, अभिषेक पटर्वधन, रोहित कोळी, आभा जोशी, के. सी. पाटील, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कायर्र्कर्ते उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply