Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष शिक्षक सेल खारघर मंडलच्या वतीने खारघर-तळोजामधील विविध शाळांतील 20 शिक्षकांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास पनवेल महापालिका प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, शत्रुघ्न काकडे, अ‍ॅड. नरेश ठाकूर, नगरसेविका नेत्रा पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, भाजप मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, रमेश खडकर, समीर कदम, सोशल मीडिया संयोजिका मोना अडवाणी, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्ष आशा बोरसे, किरण पाटील, अ‍ॅड. राजेंद्र अग्रवाल, नवनीत मारू, प्रभाकर बांगर, अश्विनी भुवड, आशा शेडगे, शोभा मिश्रा, उमेरा खान, नाझनिन खान, विजय बागडे, अक्षय पाटील,  फुलाजी ठाकूर, कांचन बिर्ला, अनू अन्सारी, सीमा खडसे, विलास आळेकर, निर्मला आळेकर, सचिन वासकर, प्रिया दळवी, विपुल चौतालिया, नरेश पांचाळ, अशोक जंगीड, निर्मला यादव, सुशीलाजी, विजयालक्ष्मी सरकार, हंसा पारघी, नवीन दुबे, श्रीकांत जावळे, संतोष भारते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्यात ग्रीन फिंगर ग्लोबलच्या अनिता चौधरी, न्यू सिटी इंटरनॅशनलच्या शुभांगी चौरे, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्सच्या प्राचार्य दुर्गा मौर्या, गोखले स्कूलच्या गौरी शिंदे, डीएव्हीच्या रश्मी जोशी, सिनर्जीचे राहुल व अभिषेक अरोरा, ज्ञानज्योत कॉलेजचे संदीप डोंगरदिवे, सिजेएम स्कूलचे संतोष पवार, हार्मोनी स्कूलच्या अंजू सलारीया, रेड क्लिफ स्कूलच्या वर्षा गणेशकुमार, आरआयसीच्या प्रणाली जाधव, ब्राईट किड्स स्कूलच्या उमेरा खान, जि. प. शाळा मुर्बीच्या अनिता शिर्के, ब्युटीफुल टूमारो फाउंडेशन रुपल धनेशा, सामाजिक शिक्षिका आयेशा अन्वर खान, अपीजय स्कूलच्या संजना चव्हाण, हार्मोनीच्या सस्मिता रौत्री, ब्राईट किड्स स्कूलच्या नाझनीन खान, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सुजाता जाधव, या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सन्मानित शिक्षकांचे कौतुक करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. शिक्षणाचे महत्त्व सांगताना त्यांनी पुढे सांगितले की जिथे शिक्षण आहे तिथे विकास आहे.

या अनुभवी व गुणी शिक्षकांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा सन्मान केल्याने खर्‍या अर्थाने न्याय मिळाला तसेच त्यांना भविष्यात अजून कार्य करण्याला चालना मिळेल.सन्मान सोहळ्यानंतर खारघर मंडल शिक्षक सेलच्या सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेलचे अध्यक्ष संदीप रेड्डी यांनी व सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ब्रिजेश पटेल यांनी मानले.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply