Breaking News

पिरवाडी येथील मांगीन देवी उत्सव

उरण : वार्ताहर

उरण शहराच्या पश्चिमेस 4 किमी असलेल्या पिरवाडी समुद्र किनार्‍यावर असलेल्या मांगीन देवीचा उत्सव व सत्यनारायण महापूजा शनिवारी (दि. 18) आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक मांगीन देवी ग्रामस्थ मंडळ पिरवाडी करीत आहे.

देवीच्या दर्शनासाठी नागाव, केगाव, उरण, मोरा, चिरनेर, जासई, करंजा, बोकडवीरा, बोरी, चाणजे, नवीन शेवा आदी ठिकाणाहून भक्तगण येत असतात. मनोभावे देवीची पूजा करीत असतात, सालाबादप्रमाणे यंदाही दर्शन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे मांगीन देवी ग्रामस्थ मंडळ पिरवाडी  यांनी विनंती केली आहे.

सकाळी 7 वाजता स्वप्नील घरत यांच्या हस्ते देवीचा अभिषेक करण्यात येणार असून दुपारी 4 वाजता किशोर कडू यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 200 वर्षांपूर्वीचे मंदिर असून दरवर्षी दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते, असे स्वप्नील घरत यांनी सांगितले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply