Breaking News

भारताकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचे सिराजचे स्वप्न

चेन्नई ः वृत्तसंस्था

भारताचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज कसून मेहनत घेण्यास व मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास सज्ज आहे. देशाकडून खेळताना सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे त्याचे स्वप्न आहे. सिराज सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघात आहे.

27 वर्षीय वेगवान गोलंदाज सिराजने नोव्हेंबर 2017मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत भारतातर्फे पाच कसोटी, एक वन-डे व तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

सिराज म्हणाला, तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. माझे स्वप्न भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे आहे. ज्या वेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी मेहनत घेईन. त्याने आपल्या यशाचे श्रेय सहकारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व ईशांत शर्मा यांना दिले आहे.

आतापर्यंत 35 आयपीएल सामन्यांत 39 बळी घेणारा सिराज पुढे म्हणाला, ज्या वेळी सर्वप्रथम संघासोबत जुळलो, त्या वेळी माझे मनोधैर्य खचलेले होते, पण कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर आत्मविश्वास उंचावला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply