Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यामुळे वीज ग्राहकांना दिलासा

वाढीव बिल होणार दुरुस्त

पनवेल : रामप्रहर वृत्त
वाढीव वीज देयक दुरुस्त करून देण्याबरोबरच वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची ग्राहकांची चिंता किमान तीन महिने दूर झाली आहे, यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची शिष्टाई कामी आली. यामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
सभागृह नेते परेश ठाकूर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्यासोबत बुधवारी (दि. 24) भिंगारी येथील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, विद्युत कंपनीचे विभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक स्वामी, जयदीप नानोटे, आर .जे.पाटील, मिलिंद सुर्यतर, भाजपचे युवा नेते अमर उपाध्याय हेही उपस्थित होते.
कोरोना संसर्ग व लॉकडाऊन परिस्थितीत महावितरण कंपनीकडून जादा रकमेची देयके ग्राहकांना प्राप्त झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अशातच विजेसंदर्भात विविध समस्या समोर आल्या आहेत. त्यांचा उहापोह करीत देयके न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नका, सरासरीनुसार दिलेल्या बिलांची दुरुस्ती करावी, ऑनलाइन बिले भरूनसुद्धा बिले आली आहेत ती दुरुस्त करावीत, बिल भरण्यासाठी किमान तीन महिन्यांची मुभा मिळावी, वीज रिडींगचा विचार स्लॅब बेनिफीटने करावा, महिनानिहाय बिल द्यावे आदी मागण्या करीत ग्राहकांचा विचार करावा, असे सभागृह नेते परेश ठाकूर, सभापती प्रवीण पाटील व युवा नेते अमर उपाध्याय यांनी सूचित केले.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जादा वीज बिल दुरुस्ती करून देणार असल्याचे मान्य करून बिल भरणा केला नसला तरी वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही तसेच तीन बिल टप्प्यांत भरण्याची अर्थात तीन महिन्यांचा कालावधी म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत वीज देयक भरण्यासाठी मुभा देण्यात येईल आणि रिडींग स्लॅब बेनिफिट देणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी दिले आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भूर्दंड पडणार नाही. अशा प्रकारे महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांना यश, तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply