पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघर येथील श्री साई गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने वतीने श्री गणपती बाप्पा व साईबाबा यांच्या मूर्तीची तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या फोटो व पादुकांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता, तसेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि स्वामी प्रकट दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी भेट देत मनोभावे दर्शन घेतले.
या वेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, सदस्य प्रशांत कदम, खारघर शहर तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, माजी नगरसेविका संजना कदम, नेत्रा पाटील, शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, युवा नेते अमर उपाध्याय, समीर कदम, किरण पाटील, बिना गोगरी, मुकेश गर्ग, राजेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper