Breaking News

शिवाजी चौैकातील तुंबलेल्या नाल्याची तत्काळ दुरुस्ती ; नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न

पनवेल : वार्ताहर

शहरातील शिवाजी चौक ते आदर्श नाका परिसरात कोपर्‍यावर असलेला छोटा नाला तुंबला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून घाणीचे पाणी रस्त्यावर वाहत होते. ही बाब पनवेलमधील नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी तातडीने खाजगी कामगार लावून ही समस्या निकाली काढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागातील छोट्या नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती, तसेच या परिसरातील राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी शैलेश गायकवाड, कर्डिले यांना बोलावून घेतले. त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली आणि त्यांचे सहकार्य व मार्गदर्शनाखाली खाजगी कामगार बोलावून घेतले. त्यांच्याकडून येथील तुंबलेल्या पाण्याचा प्रश्न निकाली काढला. या कार्यतत्परतेबद्दल परिसरातील नागरिक नगरसेवक राजू सोनी यांना धन्यवाद देत आहेत.

– लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहराचा विकास करण्यासाठी शहरात कुठल्याही ठिकाणी समस्या असल्यास व ती मला कळल्यास मी तातडीने त्या ठिकाणी पोहचून ती समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतो.

-राजू सोनी, नगरसेवक

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply