Breaking News

पनवेल महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापालिकेच्या वतीने मंगळवार 11 एप्रिल रोजी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तीन गटात घेतल्या जाणार असून तिन्ही गटांसाठी विषय सारखेच असतील. निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभाग घेणार्‍यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मंगळवार 11 एप्रिल रोजी निबंध व वक्तृत्व  स्पर्धेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या स्पर्धा लोकनेते दि. बा. पाटील पनवेल महापालिका शाळा क्र. 01, दांडेकर हॉस्पीटल समोर, पनवेल येथे घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धा तीन गटात घेतल्या जाणार असून तिन्ही गटांसाठी विषय सारखेच असतील. निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभाग घेणार्‍यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका लोकनेते दि. बा. पाटील मनपा शाळा क्र.01 याठिकाणी कार्यालयात अनुपमा डामरे, मुख्याध्यापिका यांच्याकडे द्याव्यात. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर होणार आहे. स्पर्धेसंबंधीत अधिक माहितीसाठी अनुपमा डामरे (9969686860), सुजित म्हात्रे (9220982310) आणि वैभव पाटील (9967912068) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
निबंध स्पर्धेसाठी वेळ सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत (एक तास) असा असेल, निबंध यापूर्वी कुठेही प्रसिध्द झालेला नसावा, एका व्यक्तीस वरील गटानुसार एकाच विषयावर एकच निबंध लिहिण्याची अनुमती असेल, सदरील निबंधात वैध संदर्भ असणे अनिवार्य राहील, वक्तृत्व स्पर्धा सकाळी 10 वाजता सुरू होईल. एका व्यक्तीस वरील गटानुसार एकाच विषयावर वक्तृत्व करण्याची अनुमती असेल, निबंध अथवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये नाव नोंदणी व सहभाग घेण्यासाठी 06 एप्रिल 2023 हा अंतिम दिवस असेल, निबंध अथवा वक्तृत्व स्पर्धेचा निकाल 13 एप्रिल 2023 रोजी जाहीर केला जाईल, निबंध अथवा वक्तृत्व स्पर्धेच्या निकालाबाबतचे पूर्ण अधिकार आयोजकांकडे राखीव राहतील, या स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली राहील, असे स्पर्धेसाठी नियम व अटी आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply