मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील काशीद परिसरात आलेल्या आई व मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मयत दोघे कल्याण येथील रहिवासी असून त्यांच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत.
डोर्थी बेंजामिन फेड्रिक (वय 73) आणि विजय लिओनेल अल्फ्रेड (वय 46) अशी मृतांची नावे आहेत. कल्याण दहीघर येथील रहिवासी असलेले हे माय-लेक चार चाकी गाडी घेऊन काशिद येथे आले होते. ते 6 एप्रिल रोजी सायंकाळी 7.45 पूर्वी चिकणी समुद्र किनार्यावरील कावडा नावाने ओळखल्या जाणार्या भागात बुडाले. त्यांना तातडीने रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी नोंद पोलिसांनी केली आहे.
मयतांजवळ असणार्या आधार कार्डवरून पोलिसांनी त्या पत्त्यावर चौकशी केली असता त्यांचे कोणीही नातेवाईक आढळून आले नाहीत. त्यामुळे या दोघांचे शव वाशी येथील शवगृहात ठेवण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी मुरूड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Check Also
लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक
पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …