Monday , October 2 2023
Breaking News

पनवेल विभागात रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप-शिवसेना युतीतर्फे रविवारी (दि. 9) पनवेल विभागात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची जोरदार तयारी केली गेली आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप-शिवसेनेतर्फे राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आल्या. पनवेल परिसरात ही यात्रा गौरवरथाचा सहभाग घेऊन रविवारी होणार आहे. खारघर येथून सायंकाळी 4 वाजता या गौरव यात्रेला सुरुवात होऊन कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल अशी फिरून पनवेल येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पुष्पवृष्टी करून समारोप होईल.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या उद्दिष्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे चालला आहे. आपल्या देशाचा गौरव जगभरात होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र परदेशात आपल्या देशाच्या विरोधात बोलतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी संघर्ष केला. दोन जन्मठेप, काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमान येथे तुरुंगवास भोगला, संघर्ष केला. त्यांच्या जाज्वल देशभक्तीला कुणीच चॅलेंज करू शकत नाही, मात्र त्यांची देशभक्ती आणि कार्याविषयी विरोधकांकडून जाणीवपूर्वक संशय निर्माण केला जात आहे. तो हाणून पाडून महाराष्ट्राची व देशाची अस्मिता असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्व अधिक वृद्धिंगत करण्यासाठी या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये संस्था, संघटना, सार्वजनिक उत्सव मंडळ, पत्रकार, नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सहकारी पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply