पनवेल : रामप्रहर वृत्त
ज्येष्ठ निरूपणकार आणि रायगडचे सुपुत्र डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनातर्फे जाहीर झालेला प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार येत्या रविवारी (दि. 16) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात होणार्या सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 10) आढावा घेण्यात आला.
खारघर येथे झालेल्या या पूर्वतयारी आढावा बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार भरत गोगावले, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त तिरुपती काकडे, पंकज भुसाने, सांस्कृतिक संचालनालय सहसंचालक श्रीराम पांडे आदी उपस्थित आहेत.
अध्यात्म, समाजप्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आलेली आहे. 25 लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या रविवारी सकाळी 10.30 वाजता खारघर सेंट्रल पार्कजवळील कॉर्पोरेट पार्क मैदान येथे होणार आहे.
या सोहळ्यास राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे व सुनील तटकरे, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेश बालदी, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जयंत पाटील, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे आणि धर्माधिकारी कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे.
इतिहासात नोंद घेतली जाईल असा समारंभ करू -एकनाथ शिंदे
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आदरणीय आप्पासाहेबांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. यामुळे या पुरस्काराची उंची वाढणार आहे. म्हणूनच माझ्यासह सर्वांनी झोकून देऊन काम करूया. इतिहासात नोंद घेतली जाईल असा ना भुतो न भविष्यती हा समारंभ करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वतयारी आढावा बैठकीत केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, येत्या 16 एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे. शासनाची व प्रशासनाची ही जबाबदारी आहे. त्यांना श्रीसदस्य सहकार्य करण्यासाठी सज्ज आहेत.
कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महापालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीसाठी समन्वय राखण्यासाठी नेमावा. सर्वच घटकांनी दिलेली जबाबदारी योग्य रीतीने बजावावी. अंदाजे 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने अत्यंत काळजीपूर्वक काम करावे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावे, असे सूचित केले.
पोलिसांना सूचना देताना मुख्यमंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावी. पोलिसांबरोबर ट्राफिक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे. 35 ते 40 हजार वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याने त्याबाबतही योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. लोकांची कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यवस्थित काळजी घ्यावी, असे सांगितले.
नवी मुंबई आणि पनवेल महापालिका यांची विशेष जबाबदारी आहे. आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व तयारी चोख ठेवावी. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय पथके यांनी पूर्ण तयारी ठेवावी, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी
इतक्या तातडीने आपण बैठक घेत आहोत याबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करावा आणि त्याप्रमाणे काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी, शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सज्ज होऊया. या दिमाखदार कार्यक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासित उद्गार शेवटी काढले.
आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रम ज्या मैदानात होणार आहे त्या मैदानाची व तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली तसेच उपस्थित अधिकार्यांशी मैदानातील व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली.