Breaking News

भाताण ग्रामपंचायतीतर्फे आधारकार्ड अद्ययावत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहोपाडा : प्रतिनिधी
आधारकार्ड धारकांसाठी डॉक्युमेंट अपडेट हे नवीन फिचर विकसित झाल्याने नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे, यासाठी भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी लक्ष्मण पाटील यांनी आपल्या निवासस्थानी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी तीन दिवसीय आयोजित केलेल्या आधारकार्ड अद्ययावत शिबिराला या भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात 294 नागरिकांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करून घेतले. सन 2015 पासून देशामध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत देशातील नागरिकांना आधारकार्ड देण्यात येत आहे. बायोमेट्रिक प्रमाणिकरणासह रहिवाशाची ओळख पटवण्यासाठी आधारकार्ड हा ओळखीचा सर्वात व्यापकपणे स्वीकारला जाणारा पुरावा आहे. नागरिकांकडून अनेक शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारकार्डचा वापर केला जात आहे. यापुढे शासकीय व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करून घेणे आवश्यक आहे. याकरिता भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी लक्ष्मण पाटील यांनी नागरिकांसाठी आधारकार्ड अद्ययावत शिबीराचे तीन दिवस आयोजन केले होते.
यासोबतच मुलगी सृष्टी हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व प्रकारची मोफत आरोग्य तपासणी, पिएम किसान योजना, सुकन्या योजनासह आधारकार्डला पॅनकार्ड 32 नागरिकांनी लिंक केले तर 35 महिलांनी फुल बनविण्याचे मोफत प्रशिक्षण घेतले. सृष्टी तानाजी पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त मोफत विविध योजनांचा लाभ तसेच इतर उपक्रमांची माहिती मिळाल्याने भाताणकरांनी सृष्टी आणि सरपंच तानाजी पाटील यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
या वेळी तीन दिवस शिबिर यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक बबन मुकादम, सूभाष मुकादम, किरण मुकादम, स्वप्नील भोईर, बलीराम मुकादम, चंद्रकांत मुकादम, दीपक दुर्गे, कृष्णा जूमारे, मारूती सते, विजय ठाकूर, नितेश भोईर, अनिल भोईर, अनंता सते, अरूण म्हस्कर, शांताराम पाटील, महेश घरत, कृष्णा भोईर आदीसह कृषी अधिकारी स्टाप, यूवा संस्थेचे सर्वे सर्वा चेतन वाघ, आधारकार्डची तीन दिवस सेवा देणारे मंदार मानकावले आदींनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply